साथ

ती काहीच म्हणाली नाही..कदाचित तिला माहित असावं तिची वेळ आली आहे.ती जाताना मी एकदाही तिच्याकडे पाहिलंसुद्धा नाही..खरंतर माझी हिंमतचं नाही झाली..मला कुठेतरी वाटतं होत तिने जाऊ नये..ती परत यावी..पण आता ते शक्य नाही..
वाटलं तिने साथ खूप दिली..पण आम्ही तिची साथ सोडायला नको होती..

सुखांची सुरूवात केली तुझ्यापासून..
तुझ्यासोबत दु:खांची वळणही घेत गेलो..
प्रत्येक वळणावर खंबीर साथ तर दिलीस तू..
प्रत्येक घाव सोसत आमच्यासोबत राहिलीस तू..
जातानाही खूप काही देऊन गेलीस तू..
पण..पुढच्या प्रवासात नसशील तू..
ही खंत कायमची देऊन गेलीस तू..

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी तरी वस्तू असते जी परमप्रिय असते..जरी ती निर्जीव असली तरी तिच्याशी जोडलेल्या आठवणी कायम महत्त्वाच्या असतात. आणि म्हणूनच जेव्हा ती आपल्यापासून दूर जाते तेव्हा फारचं दु:ख होत..
माझ्याही बाबतीत असचं काहीसं घडलं..
ती होती आमची पहिली गाडी..
पहिलं प्रेम,पहिलं यश..पहिली कोणतीही गोष्ट माणूस कधीचं विसरत नाही..आणि तीचं महत्त्वही तेवढंच असतं..

आमची गाडी जेव्हा पहिल्यांदा घरी आणली तिला पाहून आनंद गगनात मावेनासा झाला..
त्यात बसणं, गाडी चालवायचा प्रयत्न करणं (learning license मिळालं होतं), भाऊ आणि मम्मी- पप्पासोबत फिरायला जाणं
त्यात अचानक कोणी भरं रस्त्यात गाडी थांबवून विचारणं
वाह!! फार छान गाडी आहे..कुठून घेतली?
रंग तर वाह!!
ते एेकून आम्हां चौघांचं एकमेकांकडे बघून choice कोणाची आहे? म्हणणं..
तिचं कायम आम्हाला अप्रूपचं होतं.
का? कोण जाणे?
खूप दिवसांपासून काहीतरी लिहायचं होतं पण काही सुचतं नव्हतं..कधी वाटलं नाही असं काही लिहिण्यात येईल माझ्या..
वाटलं लोकं खिल्ली उडवतील आपली (पण मनातलं शब्दात मांडायचं होतं)
पण आज मला शाळेतील एक गोष्ट आठवली..शाळेत मराठी निबंधांचे विषय असायचे शाळेचे आत्मवृत्त, झाडाचे आत्मवृत्त ते एेकून फार हसू यायचं.. वाटायचं असं होऊ शकतं का..
पण आता जाणीव झाली खरी जर ती बोलत असती तर नक्की तिने हट्ट केला असता ‘न जाण्याचा’

9 thoughts on “साथ

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s